दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या शिक्षक आरोपीला आजन्म कारावास – माणगांव कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

माणगाव | सलीम शेख |

माणगांव तालुक्यातील गोरेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत सन २०१६ ते दिनांक १७/०७/२०१९ चे दरम्यान रायगड जिल्हा परिषद मराठी शाळा फलाणी ता. माणगांव येथील जुन्या इमारतीच्या खोलीत दोन अल्पवयिन मुलींवर अत्याचार व अनैसर्गिक अत्याचाराचे अमानुष कृत्य करणाऱ्या नित्यानंद धोंडू पाटील या नराधमास अखेर आजन्म मरेपर्यंत कारावासाची शिक्षा सूनावली आहे. मा. जिल्हा न्यायालयाचा हा ऐतिहासिक निर्णय असुन अशा प्रकारे अमानुष निचकृत्याला माफी नाही हेच सिध्द झाले आहे.

सदर घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, या गुन्ह्यातील फिर्यादी यांची पीडित मुलगी व तिची एक मैत्रिण या इयत्ता पहिली पासून रा.जि.प. मराठी शाळा फलाणी येथे शिक्षण घेत होत्या. व त्यांच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन त्या इयत्ता दुसरी मध्ये शिकत असल्यापासून आरोपीत याने गैरफायदा घेऊन पिडित दोन मुलींवर जबरदस्तीने वारंवार लैंगिक अत्याचार व अनैसर्गिक अत्याचार करून सदर प्रकार कोणाला सांगितला तर मी तुम्हाला मारेन अशी पिडित मुलींना दमदाटी करून धमकी दिली.

वरील घटनेची फिर्याद गोरेगाव पोलिसांनी घेतली भा.द.वि.स.कलम ३७६ (२)(एफ) (आय)(एन), ३७६ (सी)(बी), ३७६(एबी), ३७७,५०६, व पोस्को कायदा कलम ४,६,८ तसेच अ.जा.ज.का.क.१(१) (डब्ल्यू)(i )(ii), ३(२)(७) अन्वये गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास शशीकिरण काशिद पोलीस उपअधिक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी माणगांव, विभाग माणगांव यांनी केला. व सदरचे दोषारोप पत्र मा.जिल्हा व सत्र न्यायालय माणगांव येथे दाखल केले. सदर खटल्याची सुनावणी मा.अति.सत्र न्यायाधीश श्रीमती पी.पी. बनकर माणगांव रायगड यांचे कोर्टात झाली.

सदर गुन्ह्यात पिडीत दोन मुलींची, एका पिडीत मुलीची आई फिर्यादीची व शाळेवर असणाऱ्या सह शिक्षिकेची तसेच वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सदर खटल्यामध्ये सहाय्यक सरकारी वकील जितेंद्र म्हात्रे यांनी सरकार पक्षाच्या वतीने काम पाहिले. व कोर्टासमोर प्रभावीपणे युक्तीवाद करून मा.सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांचे महत्वाचे न्यायनिर्णय दाखल केले.

सदर केसच्या सुनावणी दरम्यान पैरवी अधिकारी उदय धुमास्कर, पोलीस उपनिरीक्षक, सौ. छाया कोपनर मपोह, शशिकांत कासार पोह, शशिकांत गोविलकर पोह, सुनील गोळे पोशि यांनी सहकार्य केले. सदर साक्षीदारांची साक्ष व न्यायनिर्णयाच्या आधारे मा.विशेष व सत्र न्यायाधीश श्रीमती पी.पी. बनकर माणगांव रायगड यांनी सदर घटनेतील गुन्ह्याच्या शाबीतीनंतर आरोपी यास दिनांक १९/५/२०२२ रोजी दोषी ठरवुन भा.द.वि.स. कलम ३७६, ३७७, व पोस्को कायदा कलम ४,६,८ नुसार कारावास आजन्म कारावास (मरेपर्यंत) सक्तमजुरीची व रुपये १,५०,००० /- (एक लाख पन्नास हजार रुपये) दंड, दंड न भरल्यास एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.

Exit mobile version