सर्वेक्षणाच्या मानधनापासून शिक्षक वंचित

| अलिबाग । प्रतिनिधी ।

मराठा सर्वेक्षणासाठी रायगड जिल्ह्यातील शिक्षकांनी कंबर कसली. रात्रीचा दिवस काम केले. मात्र, सरकारकडून त्यांना अद्याप सर्वेक्षणाचे मानधन देण्यात आले नाही. त्यामुळे हजारो शिक्षक मानधनाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे.

आरक्षणासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज लढा देत आहे. मराठा सर्वेक्षणाचे काम सरकारने वेगवेगळ्या यंत्रणेकडे सोपविले. रायगड जिल्ह्यातील शिक्षकही कामाला लागले. महिन्याभरात हे काम पूर्ण करायचे होते. त्यासाठी जिल्ह्यातील हजारो शिक्षक सर्वेक्षणाचे काम करत होते. प्रत्यक्ष गावात जाऊन ऑनलाईन पद्धतीने शिक्षकांनी सर्व्हे केला. मात्र, अनेक महिने उलटूनही सरकारने शिक्षकांचे मानधन दिले नाही. शिक्षकांना राबवून घेतले; परंतु त्यांच्या कामाचा मोबदला दिला नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. अलिबाग, पेण, कर्जत, पनवेल व इतर तालुक्यांतील शिक्षकांचे मानधन खात्यात जमा झाले नसल्याची माहिती समोर येत आहे.

मराठा सर्वेक्षणाचे काही मानधन दिले. परंतु, काही मानधन शिल्लक राहिले आहे.

प्रमोद भोपी,
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक संघ,
तालुका शाखा अलिबाग

Exit mobile version