पुणे, जेजुरी सहलीचा लुटला मनमुराद आनंद; जुन्या नव्या आठवणींना दिला उजाळा
। माणगाव । वार्ताहर ।
उतेखोल केंद्रातील शिक्षकांची केंद्र प्रमुख शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी (दि.7) रोजी काढण्यात आलेल्या एकदिवसीय पुणे, जेजुरी सहलीचा शिक्षकांनी मनमुराद आनंद लुटला. या सहलीत शिक्षकांनी आपल्या जुन्या, नव्या आठवणींना उजाळा देत विविध स्थळांची पाहणी करीत स्नेह भोजनाचा एकत्रित आस्वाद घेत मौजमजा केली.
या सहलीत केंद्रप्रमुख शंकर शिंदे, अस्मिता खडतर, पूर्वा येलवे, निलिमा गायकवाड, सुनिता पिंगळे, सुधा साळवी, नंदिनी वाले, मधुरा वेदपाठक, सुदर्शन वाघोरकर, वनिता डोळस, केशरबाई सानप, रितिका गोसावी, स्नेहल उतेकर, नेहा मोरे, पूजा उभारे, रमेश उभारे, दिनेश खडतर, गोरक्ष घोडे आदी शिक्षक बंधू-भगिनी उत्साहात सहभागी झाले होते.
आपल्या रोजच्या शैक्षणिक कामात व्यस्त असणारे शिक्षक बंधू-भगिनी यांनी वर्षातून एकदा थोडासा विरंगुळा मिळावा म्हणून माणगाव उतेखोल केंद्रातील शिक्षकांनी पुणे, जेजुरी या ठिकाणी सहलीचे आयोजन केंद्र प्रमुख शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते. मंगळवारी पहाटे साडेचार वाजता माणगाव येथून खाजगी बसने या शिक्षकांची सहल ताम्हिणीमार्गे पुणे जिल्ह्याकडे रवाना झाली. प्रवासादरम्यान ताम्हाणे घाटातील विविध निसर्गरम्य विलोभनीय दृश्यांचा तसेच खोल दरीचा आनंद शिक्षक बंधू-भगिनींनी बसमधून घेतला. त्यानंतर पुणे जिल्ह्यात या शिक्षकांची सहल पोहचल्यावर शिक्षकांनी पुणे जेजुरी, नारायणपूर, प्रति बालाजी, कात्रज सर्पोद्यान, प्राणी आणि पक्षी संग्रहालय आदी स्थळांना भेट दिली. सर्वांनी सहलीचा मनमुराद आनंद घेतला. त्यानंतर मंगळवारी रात्री माणगाव मुक्कामी येऊन सहलीची शिक्षक बंधू-भगिनींनी उत्साहात सांगता केली.