। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
मलेशिया ओपन 2025 च्या स्पर्धेच्या माध्यमातून बॅडमिंटन नव्या वर्षातील नव्या सत्राचा शुभारंभ झाला आहे. पण भारतीय स्टार शटलरच्या पहिल्याच सामन्यात खेळाडूंना एक विचित्र अनुभव आला. मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथील एक्सियाटा एरिना स्टेडियमवर बॅडमिंटनचे मॅचेस खेळवण्यात येत आहे. 7 जानेवारी 2025 पासून सुरु झालेल्या या स्पर्धेतील पहिल्या दिवशी आयोजकांची फजिती झाली. कारण छतगळतीमुळे सामन्यात आलेला व्यत्यय आणि त्यामुळे मॅच पुढे ढकलण्याचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरला.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत असा प्रकार होणं म्हणजे हास्यस्पदच आहे. छतगळतीमुळे नव्या वर्षातील पहिली बॅडमिंटन स्पर्धा ज्या स्टेडियमवर खेळवण्यात आली. त्या ठिकाणच्या कोर्ट 2 आणि कोर्ट 3 वरील सामन्यात छतगळतीच्या समस्येमुळे खेळात व्यत्यय पाहायला मिळाला. या दोन्ही कोर्टवरील लढती थांबवण्यात आल्या. कोर्ट नंबर 3 वर भारतीय शटलर एचएस प्रणॉय विरुद्ध कॅनडाचा ब्रायन यंग यांच्यातील लढत सुरु होती. ही लढत छतगळतीमुळे थांबवण्यात आलेल्या लढतींपैकी एक आहे. पहिल्या फेरीतील लढतीत भारताच्या प्रणॉय रॉय याने पहिला सेट 21-12 असा जिंकला होता. दुसर्या सेटमध्ये तो 6-3 अशा आघाडीवर असताना ही मॅच शेवटी थांबवण्यात आली. कोर्टवर पाणी जमा झाल्यामुळे अनेकदा ब्रेक घेतल्यावर अखेर सामना पुढच्या दिवशी जिथून थांबला तिथून पुढे खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. 12.43 कोटींची बक्षीस मिळणार आहेत.