कशेळे-खांडस रस्त्याला भीषण अपघात

एक ठार, दोन गंभीर
| नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील कशेळे ते खांडस रस्त्यावर मार्गाचीवाडी येथे 30 मे रोजी दुचाकी यांच्यात झालेल्या अपघात एक जण ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक झाल्याने झाला.
कर्जत तालुक्यातील नागेवाडी गावातील तरूण महादू थोरड मोटारसायकलवरून एक सहा वर्षीय, एक वर्षाचा मुलगा आणि विष्णू बांगरा अशा तिघांना घेऊ जात होता. या अपघातात दुचाकीस्वार महादू थोराड यांचा मृत्यू झाला असून, तर विष्णू बांगारा आणि दुसर्‍या दुचाकीवरील मोहन पारधी असे तिघे जखमी झाले. हे दोन्ही तरुणांवर पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचार घेत आहेत.

Exit mobile version