भीषण अपघात! मुंबई-गोवा महामार्गावर ट्रकची एसटीला धडक

चालक-वाहकासह एकूण 18 प्रवासी जखमी

। महाड । प्रतिनिधी ।

मुंबई-गोवा महामार्गावर महाड शहराजवळ एसटी बस आणि कोळशाची वाहतुक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात बसचे फार मोठे नुकसान होऊन एकूण 18 प्रवासी जखमी झाल्याची माहीती मिळाली आहे.

आज मंगळवारी (दि.9) सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास मुंबई महाबळेश्वरवरुन एसटी बस महाडकडे येत असताना महाड शहराच्याजवळ नाते खिंड येथे कोळशाची वाहतुक करणाऱ्या ट्रकची भीषण टक्कर होऊन हा अपघात झाला. या अपघातात बसमधील एकूण 23 प्रवाश्यांपैकी चालक-वाहकासह एकूण 18 प्रवासी जखमी झाले असून एक प्रवासी गंभीर जखमी झालेला आहे. अपघातात जखमी झालेल्या सर्व व्यक्तींवर महाडच्या ट्रॉमा केअर युनिटमध्ये उपचार सुरु आहेत. या अपघतामध्ये एसटी बसचे फार मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच महाड शहर आणि महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वाहतुक सुरळीत करण्यात आली आहे.

Exit mobile version