महावितरण कार्यालयावर ठाकरे सेनेची धडक

| रसायनी | प्रतिनिधी |

मोहोपाडा येथील महावितरण कार्यालयात वासांबे जिल्हा परिषद विभागातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन परिसरातील वीजविषयक समस्यांवर चर्चा केली. यावेळी स्मार्ट मीटरची सक्ती, ग्राहकांना येणारी वाढीव वीजबिले तसेच वीज वितरण सेवेतील विविध प्रश्नांवर अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले. या चर्चेदरम्यान महावितरणचे कार्यकारी अभियंता अनिस हुलसुरकर आणि सहाय्यक अभियंता किशोर पवार यांच्यासमोर परिसरातील ग्राहकांच्या समस्या मांडण्यात आल्या. स्मार्ट मीटर बसविण्याबाबत ग्राहकांच्या मनातील शंका, वीजबिलांमध्ये येणारी वाढ आणि वीज वितरण सेवा अधिक सुरळीत करण्याच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी ठाकरे गटाचे विभागप्रमुख मंगेश पाटील, संपर्कप्रमुख अनिल पिंगळे, माजी सभापती रमेश पाटील, माजी उपसभापती गजानन मांडे, माजी सरपंच रोशन राऊत, माजी उपसरपंच दत्तात्रय खाने, अमित मांडे, शहरप्रमुख निलेश जुनघरे, सुरेश पाटील, रविंद्र गायकवाड यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version