विनामास्कवाल्यांवर करडी नजर
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने प्रशासन पुन्हा सतर्क झाले असून,अलिबाग नगरपालिकेच्यावतीने शहरात विनामास्क फिरणार्यांवर पुन्हा एकदा दंडात्मक कारवाई सुरु केलेली आहे.
सध्या थर्टी फर्स्टच्या निमित्ताने अलिबाग परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक येऊ लागलेले आहेत.सर्वच ठिकाणी सोशल डिस्टिंसिंगचा फज्जा उडताना दिसत आहे.शिवाय कोरोनाचे रुग्णही वाढू लागलेले आहेत.जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी जिल्ह्यात सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंधही आणलेले आहेत.शिवाय नगरपालिका प्रशासनांना विनामास्क फिरणार्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत.त्यामुळे शहरात आता नगरपालिका कर्मचारी विनामास्क फिरणार्यांवर दंडात्मक कारवाई करताना दिसत आहेत.
अलिबाग पालिकेचा कारवाईचा बडगा
