विवस्त्र अवस्थेत विद्यार्थिनीचा मृतदेह

। लखनऊ । वृत्तसंस्था ।
उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यातील गुरसहायगंज पोलीस स्टेशन परिसरातून दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या सहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आल्याचे आता स्पष्ट झाले आह. शृंगीरामपूर गावात मोहरीच्या शेतात तिचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत सापडला आहे. मृतदेहाची अवस्था पाहून पोलीस आणि ग्रामस्थांनी बलात्काराची भीती व्यक्त केली आहे. मुलीची ओळख पुसण्याच्या उद्देशाने मारेकर्‍यांनी तिच्या चेहर्‍यावर ज्वलनशील पदार्थ टाकल्याचंही स्पष्ट झाले आहे. क्रुरतेची सीमा गाठत नराधमांनी मुलीची ओळख मिटवण्याचा प्रयत्न केला.
गावकर्‍यांना मृतदेहाची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. यानंतर पोलिसांनी टनास्थळाची पाहाणी करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. यानंतर तत्काळ फॉरेन्सिक टीमला देखील पाचारण करण्यात आले.
कन्नौज जिल्ह्यातील गुरसहायगंज जवळील एका गावात शेतकर्‍याची 10 वर्षांची मुलगी त्याच गावातल्या शाळेत सहाव्या वर्गात शिकत होती. घराबाहेर खेळत असताना ती अचानक बेपत्ता झाली. शेतकरी कुटुंबियांनी यासंबंधी तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.
मात्र, एखाद्या ओखळीच्या व्यक्तीसोबत मुलगी गेल्याची शंका मनात धरून पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य ओळखलं नाही.त्यानंतर दोन दिवसांनी संध्याकाळी कमलगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शृंगीरामपूर या ठिकाणाहून पोलिसांना फोन आला. गावातील रहिवासी मनशा नाथ मिश्रा यांच्या मोहरीच्या शेतात विद्यार्थिनीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला. शेतात कसणार्‍या सतीश याने या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली.

Exit mobile version