। रसायनी । वार्ताहर ।
मुंबई मराठी साहित्य संघ व सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि.21) सायंकाळी निमंत्रितांचे हास्य कविसंमेलन संपन्न झाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्याध्यक्षा उषा तांबे यांनी तर सूत्रसंचालन मनोज वराडे यांनी केले.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रमुख कार्यवाह डॉ. अश्विनी भालेराव, प्रकाश पागे कोषाध्यक्ष, अशोक बेंडखळे कार्यवाह, शब्दवेल सचिव अश्विनी अतकरे, खजिनदार देवेंद्र इंगळकर उपस्थित होते. या कविसंमेलनामध्ये नितीन वरणकार, संजय कावरे, प्रवीण सोनोने, महादेव लुले, अमोल चरडे, प्रवीण बोपुलकर या कवींनी आपल्या कविता सादर केल्या. याप्रसंगी महाराष्ट्राचा हास्य कवी स्पर्धा 2024 या स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम सुद्धा पार पडला. यामध्ये प्रथम श्रीराम घडे-मेहुणीची आरती, द्वितीय अजय माटे-गूड मॉर्निग पथक, तृतीय पल्लवी चिंचोळकर-उद्यापासून सुरूवात करते, तर उत्तेजनार्थ क्रमांक आर.के. आठवले-जांगडगुत्ता, रामदास गायधने-डावा डोया, चेतन सुरेश सकपाळ-खड्ड्यांचे आभार, महेंद्र सूर्यवंशी-पडत जा तिच्या पाया, विशाल कुलट-जुटीन काय भौ यंदा माय लगन, रुतुजा कुलकर्णी-खिशातलं पाकीट चेक करायला हवं, नंदेश गावंड-निराशा, अशोक मिरगे-माझी कोपरखळी, रविकिरण पराडकर-पॉझिटिव्ह, सागर सोनवणे-भाऊबीज यांना प्राप्त झाला.