। म्हसळा । वार्ताहर ।
एकात्मिक बाल विकास नागरी प्रकल्प तळा बिट अंतर्गत म्हसळा शहरातील 10 अंगणवाडी, चिराठी, दुर्गवाडी, आदिवासी वाडी, सावर, बौद्धवाडी, राम मंदिर, कुंभारवाडा, नवेनगर, पोस्ट लेन, काझी मोहल्ला मिळून ‘राष्ट्रीय पोषण माह’ अभियान व ‘सही पोषण देश रोशन’ कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमा अंतर्गत किशोरवयीन मुलींना आहार, आरोग्य या विषयावर मार्गदर्शन तसेच तिन ते सहा वर्षे मुलांसाठी पूर्व शालेय शिक्षण, ओटी भरण, अन्न प्राशन दिन, सुपोषण दिवस, टिएचआर पासून बनविलेले पदार्थ, गरोदर व स्तनदा मातांना देण्यात येणार्या सेवा, परसबाग, लेक लाडकी योजना, बेटी बचाव बेटी पढ़ाव, लाडकी बहिण योजना या सर्वांचे फलक लावण्यात आले होते. पदार्थ तसेच हिरव्या भाज्या, कडधान्य, फळ ईत्यादी साहित्य वस्तु स्वरुपात मांडणी करून त्याचे महत्व व फायदे प्रत्येक अंगणवाडी सेविकांच्या मार्फत सांगून उपस्थित मुली, विद्यार्थी, पालक यांना मार्गदर्शन करण्यात आले.