। माणगाव । प्रतिनधी ।
माणगाव येथील जे.बी.सावंत एजुकेशन सोसायटीचे टिकमभाई मेथा कॉमर्स कॉलेज व श्रीमती सवती नीलकंठ सावंत ज्युनिअर कॉलेजमधील एकूण 83 विध्यार्थ्यांना प्रत्येकी 2 हजसा 500 रुपये शिष्यवृत्तीचे वाटप शुक्रवारी (दि.20) करण्यात आले.
या शिष्यवृत्तीचे धनादेश माणगाव तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार घेमुड व संस्थेचे सेक्रेटरी नानासाहेब सावंत व महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य रामदास पुराणिक त्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. शिवाजी मंदिर ट्रस्ट दादर व सरस्वती एजुकेशन सोसायटी मुंबई यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. मॅनेजर सुधीर सावंत व आण्णासाहेब सावंत तसेच नानासाहेब सावंत यांच्या संकल्पनेतून बहुजन समाजातील गरीब विध्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी एकूण 2 लाख 7 हजार 500 रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वाटप विध्यार्थ्यांना करण्यात आले. यामुळे गरीब विध्यार्थ्यांच्या फीचा प्रश्न सुटल्याचे प्राचार्य हर्षल जोशी यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितले. या कार्यक्रमात नानासाहेब सावंत, रामदास पुराणिक यांच्यासह नतीन मुटकुळे, जगदीश शिगवण, भारत पवार, निकिता मांडवकर, सारिका सायगावकर, दिलीप ढेपे, संजय गायकवाड, ग्रंथपाल अमित बाकाड़े, शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.