| पनवेल | प्रतिनिधी |
गावठाण विस्तार आणि बळजबरी करून टॉवर उभारणाऱ्या मुंबई ऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात चिंध्रण येथे ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचा चौथा दिवस उजाडला. याठिकाणी उपोषणकर्त्यांमध्ये एकूण 16 ग्रामस्थांनी सहभाग घेतला असून, यामध्ये समीर पारधी या आदिवासी मुलाची आज प्रकृती खालावली आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवशीही कोणतेही अधिकारी याठिकाणी फिरकलेच नाहीत, त्यातच उपोषणकर्त्यांमध्येदेखील आता थकवा येऊ लागला आहे. चिंध्रण ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुजित पाटील यांना थकव्यामुळे बोलताना त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे प्रशासन आतातरी जागे होईल का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.