हाडे होतात कमकुवत
मुंबई | प्रतिनिधी |
जगभरात कोरोना महामारीनं हाहा:कार माजवला आहे. याच्या नवनव्या व्हेरियंटमुळे लोकांच्या संकटात वाढच होत आहे. त्यातच कोरोनामुक्त झाल्यानंतर होणार्या आजारांमुळे लोकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. म्युकरमायकोसिससोबत आणखी एका आजाराने एन्ट्री केली आहे. म्युकरमायकोसिसनंतर मुंबईत बोन डेथ या आजाराचं नवीन संकट उभं राहिलं आहे. कोरोनातून बरं होणार्या या आजाराचा सामना करावा लागत आहे. मुंबईमध्ये बोन डेथचे तीन रुग्ण आढळले आहेत. बोन डेथला अॅव्हैस्कुलर नेक्रोसिस असेही म्हटलं जाते.
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार, मुंबईच्या माहिम येथील हिंदुजा रुग्णालयात बोन डेथच्या तीन रुग्णावर उपचार करण्यात आले आहेत. या सर्वांचं वय 40 पेक्षा कमी आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर दोन महिन्यात बोन डेथ हा आजार झाल्याचं समोर आलं आहे. बोन डेथ या आजारांमध्ये हाडं निकामी होतात. शरिरातील रक्ताभिसरण व्यवस्थित होत नाही. हे प्रामुख्यानं या आजाराची लक्षणं आहेत. डॉक्टरांच्या मते, भविष्यात बोन डेथ या आजाराचे रुग्ण वाढू शकतात.