। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
टी-20 विश्वचषकानंतर हार्दिक पांड्याला कर्णधारपद मिळेल अशी अपेक्षा होती. पण, अजित आगरकरच्या निवड समितीने सूर्यकुमार यादवकडे टी-20 संघाचे नेतृत्व सोपवण्याचा निर्णय घेतला. या धक्क्यातून सावरत आता हार्दिक बांगलादेशविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेसाठी कसून मेहनत घेताना दिसत आहे. हार्दिकने सरावाचे काही फोटो त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. परंतु, आयसीसीने एक ट्विट करून त्याला धक्का दिला आहे. हार्दिक पांड्याची आगामी बांगलादेश मालिकेपूर्वी आयसीसी टी-20 अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत घसरण झाली आहे. सहाव्या क्रमांकावर असलेला पांड्या आता एकूण 199 रेटिंग गुणांसह सातव्या स्थानावर घसरला आहे. पांड्याची क्रमवारीत घसरण झाली असली तरी तो आगामी टी-20 मालिकेच्या तयारीला लागला आहे.