सुवर्णपदकाचं स्वप्न भंगले

सिंधूचा पराभव

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाच्या दिशेने वाटचाल करणार्‍या बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचा प्रवास सेमीफायनलमध्ये संपुष्टात आला आहे. चीनी तैपेईच्या ताई जू यिंगकडून सिंधूला 18-21, 12-21 अशा सरळ सेटमध्ये मात पत्करावी लागली. यिंगने दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश नोंदवला आहे. ताय जू यिंग ही विश्‍वातील अग्रगण्य बॅडमिंटनपटू आहे. या सामन्यापूर्वी सिंधूविरुद्ध तिची आकडेवारी 13-5 अशी होती.
रिओ ऑलिम्पिकची रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू उपांत्य फेरीत कठीण आव्हान सादर करू शकली नाही. पहिल्या गेममध्ये ती चांगली प्रतिकार करत होती. पण दुसर्‍या गेममध्ये ताई जू यिंग तिच्यावर वरचढ ठरली. कांस्यपदकाच्या लढतीत ती बिंगजाओसमोर खेळणार आहे. याआधी सिंधूने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये एकही सेट गमावला नव्हता. मात्र या सामन्यात यिंगने तिचा प्रवास थांबवला.

Exit mobile version