शेखाचे गाव मोहल्यातील वीज समस्या मिटली

| वाघ्रण | वार्ताहर |

अलिबाग तालुक्यातील शेखाचे गाव मोहल्ला विद्युत ग्राहकांची गेले सत्तावीस वर्षांची समस्या पेढांबे ग्रामपंचायत माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य आविनाश बाळाराम आचरेकर यांनी आपले सहकारी कर्मचाऱ्यांना विश्‍वासात घेऊन चर्चा व पाठपुरावा करून सोडवल्या बद्दल येथील ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.

या मोहल्ल्या मधल्या जवळ जवळ साठ विद्युत ग्राहकांना अनेक वर्ष सिंगल फेज विद्युत पुरवठा केला जात होता, त्यामुळे त्यांना अनेक समस्या निर्माण cहोत होत्या. त्यावर पर्याय म्हणून अथक परिश्रम आणि मेहनत घेऊन ही समस्या सामुहीक पद्धतीने सोडविल्या बद्दल येथील ग्राहक खुश होऊन आभार व्यक्त करीत आहे.

या कामात महावितरणचे अलिबाग अभियंता भिसे, अलिबाग दोनचे उपअभियंता कमळाकर अंधाडे, चिंचवली सेक्शनचे आकाश झाकेरे, रावसाहेब इंगळे, सुधीर गोठणकर, बाळाराम रोखडे, अविनाश आचरेकर, मेघनाथ पाटील आणि सागर सांगोले आदीना धन्यवाद दिले आहेत.

Exit mobile version