माणगाव पोलिसांची तत्परता; मुलीचा घेतला चार तासात शोध

। माणगाव । वार्ताहर ।
माणगाव पोलिसांनी घरातून निघून गेलेल्या एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा चार तासाच्या आत शोध घेऊन तिला तिच्या पालकांच्या स्वाधीन केले. याकामी माणगाव पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मंगला संदिप वाघमारे ( वय-28) रा.विठ्ठलवाडी ता.माणगाव यांनी त्यांची मुलगी तेजश्री संदिप वाघमारे (वय-13) ही दि.27 जुन रोजी घरात कोणालाही काही न सांगता कोठेतरी निघून गेली असल्याबाबत तक्रार दि.28 जुन रोजी दिली होती.

याचे गांभीर्य ओळखुन सहायक फौजदार कुवेस्कर, पोलिस नाईक खिरीट, शिंदे, डोईफोडे, पाटील यांनी तात्काळ मिळालेल्या गुपणीय माहितीच्या आधारे सदरची पिडीत मुलगी ही तिचे परिचयातील असलेला अर्जुन याच्या सोबत त्याच्या आंबेत कोकरे गावी असल्याची माहिती मिळवली व सदरची माहिती ही प्रभारी अधिकारी यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाने आंबेत कोकरे येथे जाऊन पिडीत मुलगी हिला ताब्यात घेऊन माहिती प्राप्त झाल्यापासून अवघ्या चार तासाच्या आत तिच्या पालकांच्या ताब्यात दिले.

Exit mobile version