। अलिबाग । प्रतिनिधी ।
प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या ग्रंथालय आणि भाषा विभागांतर्फे ग्रंथदिंडीचे आयोजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले होते.
शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ’वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत ग्रंथोत्सव आणि ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रंथदिंडीचे पूजन आणि उद्घाटन अलिबागचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे संचालक प्रा. विक्रांत वार्डे, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. रवींद्र पाटील, ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा. कांचन मात्रे, कार्यालयीन सल्लागार गीते सर, कला व मराठी भाषा विभाग प्रमुख डॉ. नम्रता पाटील, संस्थेचे जनसंपर्क अधिकारी अमोल नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी पालखीतील सरस्वती व ग्रंथपूजा करून केली. यानंतर ग्रंथ सेवेच्या पालखीची पताका किशोर साळे यांनी खांद्यावर घेऊन यानंतर सर्व मान्यवर आणि विद्यार्थी यांच्या साहित पालखी गोकुळेश्वर मंदिर ते संपूर्ण संकुलामध्ये फिरवण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांनी रिंगण सादर केले. महाविद्यालयाचे संचालक विक्रांत वार्डे यांनी ग्रंथदिंडीच्या आयोजनाविषयी भूमिका स्पष्ट करून पालखीचे यशस्वीपणे आयोजन केल्याबद्दल ग्रंथालय विभागाचे विशेष कौतुक केले. सदर पालखी आयोजन वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातर्फे करण्यात आले होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. रसिका म्हात्रे, प्रा.पूजा म्हात्रे, प्रा. केतकी पाटील, प्रा. सुजित पाटील, प्रा. दिनेश पाटील, प्रा. मिलिंद घाडगे, प्रा तेजेश म्हात्रे, प्रा. गणेश पाटील, प्रा. प्रदीप गावंड, प्रा. वृषाली घरत, प्रा. योगिता पाटील, प्रा. रूपाली पाटील, प्रा. कैलाससिंह राजपूत, प्रा. हितेश पाटील या सर्वांनी मेहनत घेतली. ग्रंथ दिंडीचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल प्र. प्राचार्य डॉ. ओमकार पोटे यांनी उपस्थितांचे कौतुक केले.