| सुतारवाडी | प्रतिनिधी |
कुंडलिका नदीच्या मार्गाकडून येरळ गावच्या वेशीपर्यंत आलेल्या वनव्याने परिसरातील 50 एकर जमिनीवरील मैदानातील गवत झाडे जळून खाक झाली आहेत. वनवा विझवण्यासाठी ग्रामस्थांनी आपल्या जीवाची बाजी लावून वनवा अटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. वनव्यामुळे फळ देणारी झाडे तसेच मैदानातील गुरांच्या वैरणीचा गवत अक्षरशः जळून खाक झाल्यामुळे आता गुरांच्या वैरणीचा ज्वलंत प्रश्न बळीराजाला पडला आहे. त्याचप्रमाणे फळ देणारे वृक्ष ही जळून खाक झाल्यामुळे बळीराजापुढे मोठा गंभीर प्रश्न उभा आहे. गेल्या वर्षी अशा प्रकारचा वनवा लागून मोठी हानी झाली होती. यावर्षी या गोष्टीची पुनरावृत्ती झाली आहे. वन खात्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरवर्षी वारंवार लागत असलेल्या वणव्यामुळे ठोस पावलं कधी उचलली जाणार असे संतप्त प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.
वणव्यात गवत जळून खाक
