रस्त्यावर दोन फुट पाणी; माणकुले फाटा ते बहिरीचापाडा रस्त्याची संरक्षण भिंत ढासळली
बांधकाम विभाग खारभुमी अधिकारी, जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज
। खारेपाट । महेंद्र म्हात्रे ।
दिनांक 14 व 15 जुन रोजी दुपारी 1 ते 4 च्या दरम्यान समुद्राच्या मोठ्या उधाणामुळे अलिबाग तालुक्यातील बहिरीचा पाडा गावाला सर्वात मोठा फटका बसला असून नव्याने डांबरीकरण केलेल्या माणकुले फाटा ते बहिरीचा पाडा रस्तयावर सुमारे दोन फुटाहून अधिक खारे पाणी वाहात आहे. तसेच माणकुले फाटा ते बहिरीचा पाडा रस्त्याची संरक्षण भिंत पुर्णपणे ढासळली आहे. समुद्राच्या खाऱ्या पाण्यामुळे व लाटांच्या माऱ्यामुळे त्या अनुशंगीक शासनाचा बांधकाम विभागीत तातडीने सदर रस्त्याच्या संरक्षण भिंत नव्याने बांधकाम यावी अशी मागणी माणकुले ग्रुप ग्रामपंचायत सरपंच सुजित गावंड यांनी केली. याकरिता शासनाने तातडीने निधी उपलब्ध करावा.
महत्वाचे म्हणजे माणकुले तिन फाटा ते बहिरीचा पाडा गावापर्यंत संरक्षण भिंत नादुरुस्त झाल्यानेसमुद्राचे पाणी गावात शिरते त्यापुढे बहिरीचापाडा माणकुले ग्रामपंचायत हद्दीतील गावांना मोठा धोका निर्माण झाला आहे. तातडीने संरक्षण भिंतीचे काम झाले नाही तर मोठ नुकसान होईल. तसेच शिरवली माणकुले रस्त्यावरील माणकुले हायस्कुल येथील पुलाला उधानाचा पाण्याचा फटका बसत असल्याने त्याची नव्याने पुल होणे गरजेचे आहे. याची दखल सार्वजनिक बांधकाम अधिकारी अलिबाग रा. जि. प बांधकाम अधिकारी जिल्हा प्रशासन स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी युनिटी तातडीने लक्ष देवुन तसेच सर्वच बहिरीचापाडा गाव संरक्षण बंधाऱ्याचे अपुर्ण राहिलेले काम पुर्ण व्हावे. तसेच समुद्राची बाह्य कडा बांधकामचे काम खारभुमी विभागाकडुन व्हावे अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडुन होत आहे. याची तात्काळ दखल शासनाने घ्यावी.