| कोर्लई | प्रतिनिधी |
मुरुड-जंजिरा पर्यटनात निसर्ग सौंदर्यात भर घालणारे नबाब कालीन ऐतिहासिक गारंबी धरण उपेक्षित असल्याचे समोर येत आहे. या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवून सुशोभीकरण करून ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.
गारंबी धरण हे अनेक वर्षे मुरुड शहराला पाणीपुरवठा करत आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून मुरुडला खार आंबोली धरणातून पाणी पुरवठा होत असल्याने या नबाब कालीन धरणाकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. याठिकाणी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी पावसाळ्यापूर्वी स्वच्छता अभियान राबविण्यात येते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर श्रीसदस्य सहभागी होऊन स्वच्छता केली जाते. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच नगरपरिषदेच्या संबंधित अधिकारी वर्गाने यात लक्ष पुरवून मुरुड-जंजिरा पर्यटनातील हा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे.
मुरूडमधील ऐतिहासिक गारंबी धरण उपेक्षित
