आघाडीच्या उमेदवारांना जनतेचा आशीर्वाद

| उरण | प्रतिनिधी |

तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या उमेदवारांतर्फे जोरात प्रचार सुरु असून, महाविकास आघाडीतर्फे नवघर जिल्हा परिषद सदस्य पदासाठी प्रेरणा कुणाल पाटील (निशाणी मशाल), भेंडखळ पंचायत समिती सदस्य पदासाठी दिपक सुरेश भोईर (निशाणी मशाल) तर नवघर पंचायत समिती सदस्य पदासाठी परेश धनाजी ठाकूर (निशाणी मशाल) हे निवडणूक लढवीत आहेत.

यावेळी जाहीर सभांच्या दिखाव्याला फाटा देत जनतेच्या दारात जाऊन थेट सवाल विचारणारा प्रचार प्रेरणा पाटील, दीपक भोईर, परेश ठाकूर यांनी राबवला आहे. विकास कोणाचा? स्वाभिमान कुणाचा? आणि लोकशाही कुणासाठी ? असे थेट प्रश्न जनतेसमोर ठेवत त्यांनी महाविकास आघाडीचा लढा हा सत्तेसाठी नव्हे, तर जनतेच्या हक्कासाठीचा संघर्ष असल्याचे ठामपणे मांडले.

याप्रसंगी महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट), शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचे सर्वच नेते, पदाधिकारी, असंख्य निष्ठावंत कार्यकर्ते, महिला आघाडी आणि युवक मोठ्या संख्येने मैदानात उतरले आहेत. प्रचारात जनतेने महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना भरभरून आशीर्वाद दिला असून, मोठ्या मताधिक्याने निवडून या, असा आशीर्वाद दिला आहे.

Exit mobile version