कर्जतमधून एव्हरेस्ट शिखर मोहिमेवर निघाले गिर्यारोहक

| नेरळ । वार्ताहर ।

कर्जत शहरातील गिर्यारोहक संतोष दगडे हे जगातील सर्वात उंचावरील असलेल्या एव्हरेस्ट मोहिमेवर चालले असून त्यांना कर्जतकरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच आतंराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार पराग बोरसे यांनी त्यांच्यासाठी ब्रॅण्डिंग मोहीम हाती घेतली आहे. आंतरराष्ट्रीय किर्तीचे चित्रकार बोरसे यांनी या मोहिमेसाठी शुभेच्छा देऊन हि मोहिम सोशल मिडीयाचा वापर करून सर्वांपर्यंत पोहोचवावी असे आवाहन केले. विवीध बाबींवर चर्चा करुन मिशन एव्हरेस्ट सपोर्टर्स वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचा निश्‍चय करण्यात आला. या महत्वाकांक्षी मोहिमेसाठी शुभेच्छा व मार्गदर्शन करताना ज्येष्ठ गिर्यारोहक दिगंबर कांबळे यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. यावेळी विवेक दांडेकर, निलेश चौंडी, दौलत जाधव, सुयोग आंबवणे यांचेसह दगडे कुटुंबातील सदस्य आणि सपोर्टर्स टिमचे सदस्य उपस्थित होते.

Exit mobile version