लोणेरे येथील तरुणीच्या हत्याकांड प्रकरण

। माणगाव । प्रतिनिधी ।

लोणेरे येथील एका लॉजवर एका तरुणीचा निरवस्त्र अवस्थेतील मृतदेह सोमवारी रात्री आढळून आला होता. या प्रकरणी पोलिसांना मृत तरुणीची ओळख पटवण्यामध्ये आता यश आले आहे. पल्लवी मोरे (22) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणीचे नाव असून, माणगाव तालुक्यातील वडगाव बौद्धवाडी येथील राहणारी आहे. या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीने प्रेम प्रकरणातून तरुणीची हत्या केल्याची माहिती मिळत आहे. मुंबई- गोवा महामार्गावरील लोणेरे इथल्या ओमकार लॉजिंगमध्ये ही घटना काळ रात्री घडली. या घटनेचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version