| दिघी | वार्ताहर |
म्हसळा तालुक्यातील खनलोशी येथे नवे औद्योगिक क्षेत्र उभारण्यात येणार आहे. कोकणातील दिघी पोर्ट जवळ नवे औद्योगिक शहर विकसित करण्यासाठी औरंगाबाद इंडस्ट्रिअल टाउनशिपच्या प्रशासनाने औद्योगिक प्रकल्प व्यवस्थापन कामांकरिता विनंती प्रस्ताव निविदा प्रसिद्ध केली आहे. दिघी पोर्ट इंडस्ट्रिअल एरिया हा दिल्ली – मुंबई औद्योगिक क्षेत्रातील शेवटचा टप्पा आहे. अन्नप्रक्रिया, औषधनिर्माण, अभियांत्रिकी क्षेत्रातील उद्योगासाठी हे शहर उभारण्याचे नियोजन बाबत औरंगाबाद औद्योगिक टाऊनशीप ने विनंती प्रस्ताव मागितली आहेत. यासोबतच प्रत्यक्ष दिघी पोर्टजवळील खानलोशी गावात देखील 94 हेक्टर जमिनीवर बंदरावर आधारीत औद्योगिक आस्थापनांकडुन महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ ने स्वारस्य निविदा देखील एकाच दिवशी प्रसिद्ध केल्या आहेत. नवीन खानलोशी एमआयडीसी मध्ये वेअरहाऊसिंग, कोल्ड स्टोरेजेस, प्रक्रिया उद्योग, पॅकेजिंग उद्योग व इंपोर्ट एक्सपोर्ट हाउसेस ना उद्योग उभारणीसाठी आमंत्रित करण्यात आलेले आहे. खनलोशी पासून दिघी बंदर हे 13 किलोमीटर तर जेएनपीटी 130 किलोमीटर अंतरावर आहे.
खनलोशी येथे एमआयडीसी उभारण्यासाठी मध्यंतरी सभागृहात चर्चा झाली. खासदार सुनील तटकरे यांचा पर्यावरण पूरक व पर्यावरणाला हानी पोचणार नाही अश्या उद्योगांसाठी नेहमी आग्रही असतात. मात्र एमआयडीसी व शासनानेही जमिनीला योग्य भाव द्यावा ही मागणी आहे.
अनिकेत तटकरे, आमदार