| म्हसळा | वार्ताहर |
दोन दिवसांपूर्वी हवामान खात्याने संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा ईशारा दिला होता. त्यातच शनिवारी (दि.17) रायगड जिल्ह्यासह म्हसळा तालुक्यात तसेच शहरात तुरळक स्वरुपाचा पाऊस पडला. या पावसात म्हसळा नगरपंचायात हद्दीतील दुर्गवाडी या ग्रामीण भागातील वयोवृद्ध महिला लक्ष्मी बांद्रे यांच्या घराच्या भिंती कोसळून आर्थिक नुकसान झाले आहे. यावेळी म्हसळा शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे कौस्तुभ करडे, सुरेश कुडेकर, अंकुश नटे व कार्यकर्ते यांनी तातडीने दखल घेऊन घराची पाहणी केली. त्यांची व्यथा शासन दरबारी मांडण्यात आली. तसेच, घर दुरुस्ती होई पर्यंत त्यांची दुसऱ्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात यावी, असे करडे यांनी मुख्याधिकारी यांना भेटून सांगितले आले. त्याच प्रमाणे अन्न धान्य, गृहउपयोगी वस्तु व सोलर लॅम्प देखील लक्ष्मीबाईंना देण्यात आले आहे.