जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या 45 तर 17 कोरोना मुक्त ; जिल्हा प्रशासनाची माहिती

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी

रविवारी रायगड जिल्ह्यातील 10 तालुक्यामध्ये 45 रुग्णांची नोंद झाली असून सद्यस्थितीत जिल्ह्यात 337 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने दिलासा मिळाला आहे. दिवसभरात 17 रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

रविवारी जिल्ह्यातील पनवेल मनपा क्षेत्रात 24, पनवेल ग्रामीण 3, उरण 1, खालापूर 3, कर्जत 2, पेण 8, मुरुड 1, रोहा 1, महाड 1 आणि पोलादपूर 1 असे 45 रुग्ण आढळले. तसेच पनवेल मनपा क्षेत्रातील 14, खालापूर 3 अशा एकूण 17 रुग्णांना बरे वाटल्याने कोरोना मुक्त घोषित करण्यात आले आहे.

आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 25 हजार 119 झाली आहे. यापैकी 2 लाख 20 हजार 073 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 709 झाला आहे. सद्यस्थितीत 337 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

Exit mobile version