खांब ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार
| गोवे-कोलाड | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील खांब ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारावर आता नागरिकांनी पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. केवळ स्थानिक पुढारी ठेक्यासाठी कोणालाही न जुमानता एकापाठोपाठ एक शासकीय जुनी इमारतीवरच हातोडा मारत ग्रामपंचायत आवारातील गट क्रमांक 11 या जागेत रायगड जिल्हा परिषद अखत्यारीत राष्ट्रीय विस्तार योजनेंतर्गत (सन 1978) साली पक्के बांधकाम करून ही शाळा उभारली गेली होती. त्यावरच आता शासकीय कोणतीच परवानगी न घेता केवळ दुसर्या ठेक्यासाठी ही इमारत तोडण्यात आल्याने ग्राम पंचायतीच्या या मनमानी कारभारावरून एकच खळबळ उडाली आहे.
तालुक्यात नामवंत असलेल्या खांब ग्राम पंचायतीत गेली अनेक वर्षे एकहाती सत्ता असलेल्या या हद्दीत अनेक विकासकामे ही मनमानी तसेच काम चलाव पद्धतीने केली जात असल्याची चर्चाची नेहमीच बोंब आहे. त्यामुळे ठेका घेण्याच्या वेळेला शासकीय इमारत एक पाडायची आणि त्या जागेवर दुसरी इमारत उभी करायची त्यामुळे केवळ ठेक्यासाठी सदरच्या जागेत असलेल्या इमारतीत आदी ग्राम कॉटर्स, तद्नंतर भाजी मार्केट, आता चक्क जुनी प्राथमिक शाळेची इमारत कोणताही ग्रामस्थांना विश्वासात न घेता विनापरवानगी पाडण्यात आली तसेच ती पाडल्याबाबत कोणताही ठराव घेण्यात आले नसल्याचे समजते. खांब ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक 11 मधील जमीन ही मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात गेली आहे, तर त्याचा मोबदला महसूल गुलदस्त्यातच असल्याचे बोलले जात आहे. खांब ग्रामपंचायतीच्या हद्दीतील इमारत पाडण्यात आली आहे याबाबत वरील विषयांतार्गत याची माहिती घेण्यासाठी येथील ग्रामसेवक पातेरे यांना संपर्क साधला, परंतु तो झाला नसल्याने याबाबतची अधिक माहिती मिळू शकली नाही. तर, जुनी इमारत पाडण्यात आली आहे हे जरी सत्य असले, तरी ती पाडण्याचा ठराव अथवा परवानगी नसल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे.
एक महिन्यापूर्वी सरपंचपदाचा पदभार स्वीकारला आहे, तसेच या कामाबाबत ग्रामस्थांनी संबंधित अधिकारी वर्गाकडे लेखी तक्रारी अर्ज केल्यानंतर सदरच्या कामाला वरिष्ठ पातळीवरून स्थगिती देण्यात आली आहे, तसेच याकामाबत परवानगी अथवा आदी ठराव मंजूर करून घेतला की नाही याची चौकशी करण्यात येईल.
कांचन मोहिते, सरपंच
ठेक्यासाठी शासकीय इमारतीच गायब करत आल्याने या गोष्टीची खांब ग्रामस्थांनी 13 मार्च 2023 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकार्यांकडे तक्रार अर्ज केला आहे. आजतागायत कोणतीच दखल घेतली गेली नाही अन्यथा हा विषय शिक्षणमंत्री तसेच ग्रामविकासमंत्री यांच्या दरबारी नेणार असल्याचे ग्रामस्थांनी ठरवले आहे. ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये.
दिलीप लाडगे, सामाजिक कार्यकर्ते, खांब