| सुधागड-पाली | वार्ताहर |
सुधागड -पाली येथील रामआळी जवळ ब्रिटिशकालीन जुने पोलीस स्थानक, तहसील व उपलेखा कार्यालय आणि न्यायालयाची वास्तू पूर्णपणे मोडकळीस आली आहे. या वास्तूचे अक्षरशः खंडरमध्ये रूपांतर झाले आहे. शनिवारी (ता.12) येथील जुन्या पोलीस ठाण्याच्या इमारतीची रस्त्याच्या बाजूची भिंत ढासळली. सुदैवाने रस्त्यावरून कोणी जात नसल्याने कोणतीही दुर्घटना झाली नाही. भिंतीचे दगड व माती रस्त्यावर आली होती.
येथील तुटलेल्या खोल्या आता मुताऱ्या झाल्या आहेत. तिथे अवैध धंदेदेखील सुरू असतात, अशी चर्चा आहे. काही वर्षांपूर्वी येथील सर्व कार्यालये इतर नवीन इमारतीत हलविण्यात आली आहेत. या वास्तूच्या दुरवस्थेबद्दल चार वर्षांपूर्वी जुलै महिन्यात या वास्तूच्या रस्त्याच्या बाजूची भिंत अशाच प्रकारे कोसळली होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.