। कर्जत । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत नसरापूर हद्दीतील मौजे चिंचवली येथील 8 खराब झालेले विज खांब महावितरण कडाव विभागाचे सहाय्यक अभियंता रितेश साबदे यांनी त्वरित बदलले आहेत. अॅड.संपत हडप हे सातत्याने पाठपुरावा करत होते. चिंचवली येथील खराब झालेल्या वीज खांबांचे काम पूर्ण झाल्यामुळे त्याच्या पाठपुराव्याला यश आले. गावातील खूप वर्षांपासून सडत पडलेले वीज खर्या अर्थाने बदलून गावातील मुख्य समस्या दूर झाली. सडलेले एखादा वीज खांब चुकून जर पडला असता तरी मोठी जीवितहानी झाली असती हे गांभीर्य लक्षात घेऊन कोणत्याही परिस्थितीत वीज खांब बदलले गेले पाहिजेत या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन गेली तीन दिवस काम सुरू होते. काही दिवसात उर्वरित गणेगाव, चिंचवली या दोन्ही गावातील वाढत्या वस्तीमधील खराब झालेले विजखांब बसविण्याचे काम पूर्ण करून देण्याचे आश्वासन उपकार्यकरी अभियंता प्रकाश देवके आणि सहाय्यक अभियंता साबदे यांनी अॅड. हडप यांना दिले.
चिंचवली येथील जुने वीज खांब बदलले
