डोलवी येथे पादचार्‍याला उडवले

पादचार्‍यासह दुचाकीस्वार जखमी
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
वडखळ पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 04 मार्च 2022 रोजी 7:45 वा.सुमारास डोलवी गावचे हद्दीत डोलवी रेल्वे फाटकाजवळ नवीन मुंबई-गोवा रोडचे गोवा लेनवर जखमी (पिडीत) रा.डोलवी ता.पेण, हे रेल्वे फाटकाजवळुन नवीन मुंबई-गोवा हायवे रोडच्या मुंबई बाजुकडून गोवा बाजूकडे जाणार्‍या लेनने डाव्या बाजूकडून चालत कामावर जात होते. त्याचवेळी मुंबईकडून गोव्याकडे जाणारा दुचाकी चालक रा.बेनेघाट ता.पेण याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, हयगयीने, बेदरकारपणे, मोटारसायकल चालवून त्यांना पाठीमागुन ठोकर मारली. या अपघातात त्यांना लहान मोठ्या गंभीर स्वरूपाच्या दुखापती तसेच दुचाक स्वार स्वतःसुध्दा जखमी होवून मोटारसायकलचे नुकसानीस कारणीभुत झाला.

याबाबत वडखळ पोलीस ठाणे येथे भा.दं.वि.क. 279 , 337,338, मोटार वाहन अधिनियम, 1988 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहायक फौजदार एन.आर.पाटील हे करीत आहेत.

Exit mobile version