धावपट्टीवरुन विमान घसरले

| मुंबई | प्रतिनिधी |

विमानतळावर आज सायंकाळी मोठी दुर्घटना घडली. हे खाजगी विमान धावपट्टीवरून घसरले आहे. आज सायंकाळी 5 वाजून 4 मिनिटांनी हा अपघात झाला. या खासगी विमानात आठ जण होत. धक्कादायक म्हणजे, विमान घसरल्यानंतर विमानाला आगही लागली होती. विशाखापट्टण ते मुंबईदरम्यान एव्हिएशनची 45 विमानाचे उड्डाण होते. परंतु, मुंबईत मुसळधार पाऊस असल्याने लॅण्डिंग करताना हे विमान धावपट्टी 27 वरून घसरले. विमान घसरल्याने विमानाला आगही लागली. दरम्यान, या दुर्घटनेनंतरही मुंबई विमानतळावरील वाहतूक सुरळीत आहे, अशी माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली.

Exit mobile version