। बीजिंग । वृत्तसंस्था ।
चीनमध्ये 133 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमान कोसळल्याचे वृत्त समोर आले आहे. दरम्यान, हा अपघात नेमका कसा झाला याबद्दल अद्यप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. अपघातग्रस्त विमान चायना इस्टर्न एअरलाइन्सचे असून ते 133 प्रवाशांना घेऊन कुनमिंगहून ग्वांगझूला निघाले होते. त्यावेळी गुआंग्शी प्रदेशात या विमानाला अपघात झाल्याचे सांगितले जात असून, ज्या ठिकाणी ही घटना घडली आहे तो डोंगराळ भाग असून अपघातानंतर डोंगरावर आग लागली आहे. दरम्यान, विमानात प्रवास करत असेलल्या प्रवाशांबद्दल अद्यप कोणतीही माहिती समजू शकलेली नाही.