। ठाणे । प्रतिनिधी ।
कल्याण पूर्वेतील मलंग रस्त्यावर एका गृह संकुलात आपल्या आई वडिलांबरोबर राहणार्या आठ वर्षाच्या बालिकेचा एका 48 वर्षाच्या व्यक्तीने गेल्या महिन्यात विनयभंग केला होता. पीडित मुलीच्या आई-वडिलांनी या संदर्भात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तरुणाला मुंबईतील कांदिवली येथून अटक केली. रमेश मुरलीधर यादव असे अटक आरोपीचे नाव आहे. तो व्यवसायनिमित्त मुंबईतील कांदिवली येथे राहतो. तो मूळचा उत्तर प्रदेशातील जोनपुर जिल्ह्यातील गुणापूर गावचा रहिवासी आहे. पोलिसांनी सांगितले, गेल्या महिन्यात आरोपी रमेश यादव हा पीडित मुलीच्या घरी पाहुणा म्हणून राहण्यास आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.