। कल्याण । प्रतिनिधी ।
आर्थिक अडचण तसेच कथित काळी जादू उतरवण्यासाठी मृतदेहाची पूजा करायच्या बहाण्याने भोंदू बाबाने महिलेची 8 लाख 87 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना भिवंडीत घडली आहे. याप्रकरणी महिलेने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीने शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी भोंदूबाबाला अटक केली आहे. या बाबाला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अशी माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. नुसरा अख्तर अलीम अन्सारी (46) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. हजरत बाबा उर्फ अमजद असद खान असे अटक करण्यात आलेल्या भोंदू बाबाचे नाव आहे.