जनतेसाठी शेकाप रस्त्यावर; खानावमध्ये रास्ता रोको

। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
अलिबाग रामराज रस्त्याची सद्यस्थिती अत्यंत भयावह असून रस्त्याची दुरावस्था झाली आहे. खड्डे, दगडगोटे, चिखल यामुळे या जीवघेण्या मार्गावरून प्रवास करणे अत्यंत कठीण झाले आहे. ग्रामस्थांनी अनेकदा निवेदने दिल्यानंतरही झोपेचं सोंग घेतलेल्या प्रशासनाला खडबडून जागे करण्यासाठी शेकाप रस्त्यावर उतरला. सकाळी 9 वाजता खानाव येथे पुकारण्यात आलेल्या या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी नवरात्रीच्या कालावधीतही शेकडो कार्यकर्ते उपस्थित राहिल्याने त्यांचे आभार मानले.

Exit mobile version