रस्त्यावरील सांडपाण्याची समस्या मिटली

| पनवेल | प्रतिनिधी |

महानगरपालिका हद्दीतील कळंबोली येथील सेक्टर 3, एल आय जी विठ्ठल मंदिरासमोरील गटाराचे सांडपाणी रस्त्यावर सातत्याने वाहत होते. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्‍न निर्माण झाला होता. यामुळे येथील नागरिकांना रस्त्यावर वाहणार्‍या सांडपाण्याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. याबाबत नागरिकांनी कळंबोलीतील स्थानिक माजी नगरसेवक रवींद्र भगत यांच्याकडे सदर समस्या निदर्शनास आणून देताच कोणताही विलंब न लावता तात्काळ त्या ठिकाणची परिस्थिती पाहून जेसीबीच्या सहाय्याने पाईपलाईन टाकून स्वखर्चातून काम करून नागरिकांची समस्या दूर केली. नागरिकांना भेडसावणार्‍या समस्येचे तात्काळ निराकरण केल्याबद्दल येथील नागरिकांनी माजी नगरसेवक रवींद्र भगत यांचे आभार मानले.

Exit mobile version