मुख्य रस्त्यावरून वाहतूक बंद
| महाड | प्रतिनिधी |
महाडजवळ असलेल्या नडगाव गावात जाणारा रस्ता कालपासून बंद ठेवण्यात आला आहे. रस्त्यालगत असलेली संरक्षक भिंत कमकुवत झाली असल्याने तिचा काही भाग पाडून टाकण्यात आला, अशी माहिती नडगाव ग्रामस्थ आणि ग्रामसेवकांनी दिली.
मुंबई-गोवा महामार्गालगत उंच टेकडीवर असलेल्या नडगाव गावात जाणाऱ्या रस्त्यालगत अनेक वर्षांपूर्वी एक संरक्षक भिंत बांधण्यात आली होती. गावात जाणारा रस्ता डोंगराच्या कडेने नेलेला आहे, त्यामुळे महामार्गाच्या बाजूने एक संरक्षक भिंत बांधण्यात आली होती. ही संरक्षण भिंत कमकुवत झालेली होती, तर काही ठिकाणी भेगा पडल्या होत्या. ज्या ठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती, तो भाग पाडून टाकण्यात आला. भिंतीला भेगा गेल्याने भिंतीचे बांधकाम कोसळून खालून जाणाऱ्या महामार्गावर कोसळण्याची भीती होती. यामुळे हा निर्णय घेतला गेला. यावेळी मुंबई-गोवा महामार्गाचे या ठिकाणी काम करणाऱ्या ठेकेदाराचे कर्मचारी, महाड तहसीलदार महेश शितोळे तसेच सरपंच, उपसरपंच आणि इतर सदस्य उपस्थित होते.
गावात जाणाऱ्या रस्त्याची संरक्षक भिंतीला भेगा पडल्या होत्या, त्यामुळे खालून जाणाऱ्या महामार्गाला धोका निर्माण झाल्या होता. भविष्यात हा धोका टाळण्यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव ही भिंत पाडण्यात आली.
महेश शितोळे, तहसीलदार, महाड