सर्प मित्रांना द रियल हिरो अवॉर्ड जाहीर

| उरण । वार्ताहर ।

पनवेलमधील पाच सर्प मित्रांना द रियल हिरो अवॉर्ड 2022 जाहीर झाले आहेत. विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ, पहेनी हिंगोली द्वारा आयोजित डॉ. संजय नाकाडे व निलीमकुमार खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त वन्य जीव क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या संपूर्ण महाराष्ट्रतल्या प्रत्येक जिल्हातील वन्यजीव रक्षक व सर्पमित्रांची निवड करण्यात आली आहे. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांना द रियल हिरो अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये तेजस उलवेकर, रणजीत जाधव, अजय पवार, निलेश तांबे, अनिल वरे या सर्पमित्रांचा समावेश आहे. सदर कार्यक्रम शुक्रवारी 23 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता विजय राज पाटील मित्र मंडळ व महाराष्ट्रातील सर्पमित्र प्राणी मित्र यांच्यातर्फे कार्यक्रम पार पडणार आहे.

Exit mobile version