| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यात यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असतानाच मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, 3 ऑक्टोबर रोजी मुंबईतून मान्सूनने माघार घेतली असून, पुढील दोन-तीन दिवसांत संपूर्ण राज्यातून मान्सून माघारी फिरण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. यंदा जून ते सप्टेंबरदरम्यान देशात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला. राज्यातील अनेक भागांत पाणीटंचाई, चारा संकट आणि आटणाऱ्या विहिरींमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. मान्सूनच्या माघारीमुळे उर्वरित पावसाच्या आशाही आता मावळल्या आहेत.
