चारफाटा ते भिसेगाव रस्त्याचे रुप पालटतयं

कर्जत पालिकेकडून विविध उपक्रम

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत शहरातील कर्जत चारफाटा ते भिसेगाव या भागातील रस्त्याने नवीन रूप धारण केला आहे. मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता अभियान यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात एक दिवस शहरातील रस्त्यांसाठी अशी मोहीम सुरु केली होती. या उपक्रमात कर्जत चारफाटा पासून भिसेगाव येथील बिकानेर चौक असा 400 मीटर लांबीचा हा रस्ता पहिल्या टप्प्यात अतिक्रमण मुक्त करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात या रस्त्याच्या कडेला पेव्हरब्लॉक तसेच स्वच्छता मोहिमेत झाडेझुडपे बाजूला करण्यात आली. या मोहिमेत तिसऱ्या दिवशी नगरपरिषद आणि तहसील कार्यालय यांच्यावतीने तिसरे दिवशी या रस्त्यावर दुतर्फा आणि मध्यभागी माती टाकण्यात आली. त्यानंतर त्या रस्त्याच्या सर्व भागात आकर्षक झाडे लावण्याचे काम या दोन्ही सरकारी कार्यालयांनी पूर्ण करून घेतले. त्याचवेळी या रस्त्याच्या दुतर्फा पथदिवे लावण्याची कामे पालिकेने केली आहेत.

या रस्त्यावर तहसीलदार डॉ शीतल रसाळ आणि पालिका मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या नेतृत्वाखाली वृक्षारोप कार्यक्रम पूर्ण करण्यात आला. त्यावेळी निवासी नायब तहसीलदार सचिन राऊत, एस आर बाचकर यांच्यासह पालिकेचे पालिकेचे कार्यालयीन प्रमुख जितेंद्र गोसावी, आरोग्य निरीक्षक सुदाम म्हसे, शहर अभियंता मनीष गायकवाड यांच्यासह महसूल कर्मचारी आणि प्लिक कर्मचारी सहभागी झाले होते. कर्जत रोटरी क्लब कडून या उपक्रमांना सलग दुसर्यांदा सहभाग घेण्यात आला असून त्या संघटनेचे अध्यक्ष सतीश श्रीखंडे आणि अन्य पदाधिकारी यांनी अनेक वृक्षांची लागवड केली. जिल्हाधिकारी यांच्या या उपक्रमामुळे कर्जत शहरातील कर्जत चारफाटा ते बिकानेर हा रस्ता शहरातील आकर्षक होत असल्याची प्रतिक्रिया तहसीलदार डॉ.शीतल रसाळ यांनी व्यक्त केली.

Exit mobile version