• Login
Wednesday, July 29, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड माणगाव

रस्ता खचला, अर्थकारण बिघडलं

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 28, 2026
in माणगाव, रायगड
0 0
0
रस्ता खचला, अर्थकारण बिघडलं
0
SHARES
21
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

25 दिवसानंतरही ताम्हिणी मार्ग ठप्पच; नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त

| माणगाव | सलीम शेख |

पुणे, माणगाव आणि दिघी आंतरराष्ट्रीय बंदराला जोडणारा महत्त्वाचा ताम्हिणी घाट मार्ग गेल्या 25 दिवसांपासून बंद आहे. दि.5 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्याच्या हद्दीत रस्त्याचा काही भाग खचला, तर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या आर्थिक, सामाजिक व पर्यटन क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील या मार्गाची दुरुस्ती अद्याप पूर्ण झालेली नसल्याने नागरिक, विद्यार्थी, व्यापारी आणि पर्यटकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

सन 2001 मध्ये वाहतुकीसाठी खुला झालेला ताम्हिणी घाट मार्ग हा पुणे आणि कोकणला सर्वात कमी अंतरात जोडणारा महत्त्वाचा दुवा मानला जातो. पुणे, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील हजारो पर्यटक कोकणातील समुद्रकिनारे, पर्यटनस्थळे आणि धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी याच मार्गाचा वापर करतात. त्यामुळे हा रस्ता कोकणच्या पर्यटन उद्योगाचा कणा म्हणून ओळखला जातो. दिघी आंतरराष्ट्रीय बंदराशी हा मार्ग जोडला गेल्यानंतर त्याचे आर्थिक महत्त्व आणखी वाढले. व्यापारी वाहतूक, औद्योगिक मालाची ने-आण, तसेच शिक्षणासाठी पुण्यात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा मार्ग अत्यंत उपयुक्त ठरला आहे. पुणे हे शिक्षणाचे प्रमुख केंद्र असल्याने रायगडसह कोकणातील हजारो विद्यार्थी दररोज या मार्गाचा वापर करतात. मात्र, रस्ता बंद असल्यामुळे त्यांना खोपोली-लोणावळा मार्गे मोठा वळसा घालावा लागत असून, वेळ आणि खर्च दोन्ही वाढले आहेत. त्यामुळे ताम्हिणी घाट बंद झाल्याचा सर्वाधिक फटका रायगड जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला बसला आहे.

येथील हॉटेल, रिसॉर्ट, होमस्टे, रेस्टॉरंट, पेट्रोलपंप, लघुउद्योजक, स्थानिक दुकानदार आणि पर्यटनावर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. पर्यटन हंगामात कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या व्यवसायिकांचे व्यवहार ठप्प झाल्याने स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, खासदार सुनिल तटकरे यांनी नुकतीच पुणे जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी खचलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात असून, दि.31 जुलैपर्यंत मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे खासदारांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे दोन दिवसांत हा रस्ता पुर्ववत सुरू होतो का, हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, ताम्हिणी घाट 25 दिवसांपासून बंद आहे आणि प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे. त्यामुळे रायगडच्या पर्यटन आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. येथील हॉटेल, होमस्टे, दुकानदार आणि विद्यार्थी सगळेच वेठीस धरले गेले आहेत. त्यामुळे रायगडच्या पर्यटन व्यवसायाचे कोट्यवधींचे नुकसान कोण भरून देणार? एमएसआरडीसीच्या निष्क्रियतेला आता जनता माफ करणार नाही. खचलेला रस्ता तात्काळ दुरुस्त न केल्यास आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे देण्यात आला आहे.

ताम्हिणी घाट मार्ग हा रायगडच्या पर्यटन आणि अर्थव्यवस्थेचा जीवनदायी दुवा आहे. हा मार्ग बंद असल्याने हजारो व्यावसायिक, हॉटेल चालक, विद्यार्थी आणि नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. एमएसआरडीसीने पुणे हद्दीतील खचलेल्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून मार्ग सुरू करावा. अन्यथा जनतेच्या हितासाठी आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

संताजी पवार,
श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष,
राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramangaov newsmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

रोहा एसटी स्थानकात अत्याधुनिक स्वच्छता यंत्रणेचे लोकार्पण

Next Post

मोबाईलच्या युगात नांगर हातात

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

प्रांताधिकाऱ्यांनीच न्यायालयीन प्रक्रियेवर उपस्थित केला प्रश्न?

July 28, 2026
sliderhome

अहवालांच्या दिरंगाईने जातवैधता प्रमाणपत्रे रखडली

July 28, 2026
sliderhome

धनदांडग्यांसाठी रेवस-रेड्डी महामार्गाच्या आलाइनमेंटमध्ये बदल?

July 28, 2026
sliderhome

भातशेती उद्ध्वस्त करून टोरंटचा रस्ता नको!

July 28, 2026
sliderhome

अखेर काम बंद आंदोलन स्थगित

July 28, 2026
sliderhome

सुडकोलीत तरुणाचा अपघात की घात?

July 28, 2026
Next Post
मोबाईलच्या युगात नांगर हातात

मोबाईलच्या युगात नांगर हातात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?