भाल ते एकविरा पायीदिंडी सोहळा

। रामनाथ । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील भाल ते पुणे जिल्ह्यातील एकविरा देवी मंदिर कार्ला, पायी दिंडी पालखी सोहळा गुरुवार दि. 16 जून रोजी सकाळी 8 वाजता भाल येथील आईच्या मंदिरात देवीची आरती व संकलप करून पायी दिंडी पालखी प्रस्थान होईल. तरी संमस्थ भक्त मंडळींनी उपस्थित राहून पालखी सोहळ्यचा लाभ घ्यावा असे आयोजकांनी सांगितले आहे. एकविरा आई सोहळा दिलीप भगत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. भाल ते क्षेत्र एकविरादेवी पालखीसह पयीदिंडी सोहळ्याचे हे 15 वे वर्ष आहे. ही भाल,कनकेश्‍वर, एमआयडीसी रोड, पेझारी, पोयनाड, पेण, खोपोली, खंडाळा घाटातून सोमवार 20 जून रोजी सायंकाळी 6 वाजता कार्ला डोंगरावर होम हवन, पूजा होईल. एकविरा देवस्थान येथे पोहचेल.

Exit mobile version