धक्कादायक! मुलाने केली सावत्र वडिलांची हत्या

। कल्याण । प्रतिनिधी ।

कल्याण टिटवाळा परिसरात एका मुलाने त्याच्या सावत्र वडिलांची निर्घृणपणे हत्या केली आहे. आपल्या बहिणीवर वडिलांची वाईट नजर असल्याच्या संशयावरून मुलाने हे धक्कादायक कृत्य केले आहे.

कल्याण टिटवाळा परिसरातील बल्याणी गावात कदीर सिद्दीकी हे आपल्या कुटुंबासोबत राहत होते. काही वर्षांपूर्वी त्यांनी त्यांच्यापेक्षा वयाने मोठी असलेल्या महिलेशी लग्न केले होते. त्या महिलेला पहिल्या पतीपासून एक मुलगा कबीर सिद्दीकी आणि मुलगी अशी दोन मुलं होती. आपल्या बहिणीवर सावत्र वडिलांची वाईट नजर आहे, असा संशय कबीर सिद्दीकी याला येत होता. या संशयातूनच रविवारी (दि. 11) त्याने आपला मित्र अल्ताफ शेख याच्या मदतीने सावत्र वडिलांची धारधार शस्त्राने हत्या केली. याप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी आरोपींना अटक केली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

Exit mobile version