राज्यात पुढचे पाच दिवस धो-धो पावसाचा अंदाज

पुणे | प्रतिनिधी |
ऐन दिवाळीत राज्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याचा इशाराही देण्यात आला आहे. राज्यात पुढील चार दिवस मेघगर्जनेसह व जोरदार पावसाचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. हवामान विभागाचे दिल्ली येथील तज्ज्ञ के. एस. होसळीकर यांनी ट्वीट करून याविषयी माहिती दिली.
दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस तसेच कोल्हापूर, सातार्‍यात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात येतेय. तसेच मुंबई-ठाण्यात हलका पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग रायगड जिल्ह्यातही हलक्या पावसाची शक्यता आहे.

Exit mobile version