| मुंबई | प्रतिनिधी |
मागील आठ दिवसांपासून सुरू असलेला बेस्ट सेवेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. बेस्ट कर्मचारी त्यांच्या मागण्यासाठी संपावर गेले होते.या कर्मचाऱ्यांच्या बहुतांशी मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्याने या कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सोमवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर मंगळवारपासूनच संप मागे घेत आल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.