| चिरनेर | प्रतिनिधी |
पनवेल येथील पिल्लई कॉलेजच्या द्वितीय वर्षातील आर्किटेक्चरचा विद्यार्थी यश अनिल आगलावे याने उज्ज्वल यश संपादन केले असून, तो कॉलेजमध्ये द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. प्राचार्या सुज्ञा माहीमकर व क्लास इन्चार्ज अजिता देवधर तसेच अन्य शिक्षकांनी त्याचे अभिनंदन केले.
पनवेल तालुक्यातील कोळवाडी गावातील अनिल आगलावे व प्राजक्ता अनिल आगलावे या मेडिकल स्टोअरच्या दाम्पत्याचा हा सुपुत्र असून, तो शाळेपासून कॉलेजपर्यंत प्रथम- द्वितीय क्रमांकाने पास होत आला आहे. उरण तालुक्यातील चिरनेर गाव हे त्याचे आजोळ आहे. आर्किटेक्चर प्रसन्ना पाटील हे त्याचे मामा आहेत. तर, आजोबा प्रमोद पाटील हे प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक व कलाकार आहेत. त्यांनी ग्रामीण रंगभूमीसह व्यावसायिक रंगभूमी तसेच दोन टीव्ही मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.
यश आगलावे हा चिरनेर येथे दिवाळीच्या सुट्टीत आजोळी आला असताना, आजोबा प्रमोद पाटील यांच्या 70 व्या जन्मदिनाचे औचित्य साधत, त्याचे मामा परिवाराकडून स्वागत करून, अभिनंदन करण्यात आले. यावेळी आजोबा प्रमोद पाटील व आजी प्रीती पाटील यांनी आमच्या यशने सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर मेहनत व परिश्रम घेतल्यामुळे त्याने हे यश संपादन केले असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी चिरनेर परिसरातील नाट्य कलाकार उपस्थित होते.





