भारतीय संगीताचा गोडवा; अमित शाह

। नवी दिल्ली । । वृत्तसंस्था ।
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात असून, लता मंगेशकर यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत आहेत.

लता दीदींनी आपल्या सुरेल आणि मंत्रमुग्ध करणार्‍या आवाजाने केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील प्रत्येक पिढीचे आयुष्य भारतीय संगीताच्या गोडव्याने भरले आहे. संगीतविश्‍वातील त्यांचे योगदान शब्दात मांडणे शक्य नाही. त्यांचे निधन हे माझे वैयक्तिक नुकसान आहे. – अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री

Exit mobile version