कशेडी घाटात टॅंकरची कंटेनरला धडक

खेड। प्रतिनिधी ।
मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बांगला मुंबई दिशेने जाणाऱ्या टँकरची कंटेनरला धडक बसून झालेल्या अपघातात टँकर चालक जखमी झाल्याची घटना मंगळवार रोजी रात्री १०.२० वाजताच्या सुमारास घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की मुंबई-गोवा हायवे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर कशेडी बंगला येथील एका अवघड वळणावर मुंबईहून गोव्याला जाणारा कंटेनर क्रमांक एम एच 43 वाय 6967 वरील चालक जुबेर मोहम्मद अहमद हा चालवीत घेऊन जात असता चिपळूण ते मुंबई असा दुधाचा टँकर  क्रमांक MH13 टीसी 014 वरील चालक बापू साप्टे राहणार आष्टी जिल्हा सांगली हा आपल्या ताब्यातील टँकर घेऊन मुंबई दिशेने जात असता कशेडी बंगला येथील वळणावर त्यानंतरची कंटेनरला   पाठीमागील चाकाला जोरदार धडक देऊन अपघात घडला.   

या अपघाताची माहिती मिळतात कशेडी  महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सहाय्यक फौजदार यशवंत बोडकर यांनी पोलिस कर्मचारी सह घटनास्थळी धाव घेऊन या  अपघातामध्ये टँकर वरील चालक हा केबिनमध्ये अडकल्याने त्याला बाहेर काढण्यात आले असुन त्याला किरकोळ दुखापत झाल्याने जगद्गुरु स्वामी नरेंद्र महाराज संस्थांच्या रुग्णवाहिकेची पाचारण करून जखमी चालकास पोलादपूर ग्रामीण रुग्णालय येथे उपचाराकरता पाठवण्यात आले. यानंतर क्रेनच्या सहाय्याने टँकर महामार्गावरून बाजूला करून  वाहतूक सुरळीत चालू केली आहे.  सदर अपघाताची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version